छत्रपती संभाजीनगर ः ३६ वी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर स्पर्धेनिमित राजाभाऊ मदने एसआरपीएफ येथे १८ वर्षांपासून गट क्रमांक १४ मध्ये कार्यरत आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांची हवालदार पदावर छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी जिल्हा हँडबॉल संघटना व सागर तांबे हँडबॉल क्लब यांच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा एकनाथ साळूंके व सागर तांबे यांच्या हस्ते राजाभाऊ मदने यांचा सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी अविनाश शिंदे, अंबादास राठोड, मिलिंद भंडारे, आसिफ शेख, भगवान चरवंडे, शेखर जाधव, सोहेल शेख, आसिफ शेख, सुभाष भाकले, युनुस शेख, नवनाथ राठोड, क्रांतीरत्न गायकवाड, राकेश वानखेडे, आर्यन वाहुळ, महेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती.



