अहिल्या नगर ः अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव व राष्ट्रीय पंच यशवंत बापट यांनी १२ नोव्हेंबर रोजी गोवा येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला सदिच्छा भेट. या वेळी त्यांनी तेथील आयोजन, खेळाडूंची व्यवस्था, पंच आदींची माहिती घेतली. गोवा राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांची भेट घेऊन अतिशय सुंदर व देखण्या आयोजना बद्दल त्यांचे अभिनंदन केले.



