नागपूर ः: आगामी अंडर-२३ महिला टी-२० ट्रॉफी (एलीट ग्रुप-ए) स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या महिला निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत विदर्भ संघाचे नेतृत्व रिद्धी नाईक करणार असून, मानसी पांडे उपकर्णधार म्हणून तिच्या सोबत काम पाहणार आहे. ही स्पर्धा २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान चंदीगड येथे पार पडणार आहे.
निवड समितीने निवडलेल्या विदर्भ संघात रिद्धी नाईक (कर्णधार), मानसी पांडे (उपकर्णधार), श्रद्धा नबिरा, आर्या पोंगडे, निहारी कवळे, ऋद्धिमा मरडवार, आयुषी ठाकरे, प्रेरणा रांदिवे, तन्वी मेंढे, वेदांती सलोडकर, रुक्षार अन्सारी, जान्हवी रंगनाथन, श्रेया लांजेवार, तृप्ती लोढे, जान्हवी तिचकुळे, अश्विनी देशमुख यांचा समावेश आहे.
विदर्भाचा हा युवा व संतुलित महिला संघ सध्या सराव शिबिरात व्यस्त असून, संघातील खेळाडू आगामी स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. अनुभवी प्रशिक्षक नुशिन अल खदीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाकडून या वर्षी उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनने विश्वास व्यक्त केला आहे की, कर्णधार ऋद्धी नाईकच्या नेतृत्वात संघ नव्या आत्मविश्वासाने आणि लढाऊ वृत्तीने मैदानात उतरून विजेतेपदासाठी आव्हान उभे करेल.



