छत्रपती संभाजीनगर ः जागतिक जिम्नॅस्टिक महासंघाच्या अधिपत्याखाली भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या वतीने पुरुष कलात्मक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत येथील सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ विशाल देशपांडे हे उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत त्यांनी ८३ टक्के गुण संपादन केले आहेत. भविष्यात त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. डॉ विशाल देशपांडे यांना २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. ते गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय पंच म्हणून विविध राष्ट्रीय खेळात सहभाग नोंदवला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ दिनेश वकील, उपाध्यक्ष डॉ बाळकृष्ण क्षीरसागर, डॉ सुहास बर्दापूरकर, सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे, सहचिटणीस डॉ रश्मी बोरीकर, सहचिटणीस डॉ सुनील देशपांडे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष सुहास पानसे, प्राचार्य डॉ सतीश पाटील, प्राचार्य डॉ विवेक मिरगणे, उपप्राचार्य डॉ अनिल शंकरवार, डॉ क्षमा खोब्रागडे, प्रा संजय गायकवाड, डॉ दयानंद कांबळे, डॉ पूनम राठोड, महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सरचिटणीस डॉ मकरंद जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


