राज्य शालेय तलवारबाजी स्पर्धेला मोठा प्रतिसाद

  • By admin
  • November 13, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेला विभागीय क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांतील सुमारे ६०० ते ६५० खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अशिष गाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडू डॉ उदय डोंगरे, भारतीय खो-खो महासंघाचे खजिनदार गोविंद शर्मा तसेच विविध जिल्ह्यांतील संघटक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ दिनेश वंजारे यांनी केले.

राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या अधिकृत पंच व अधिकाऱ्यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात आली. तांत्रिक समितीत अजय त्रिभूवन, पेरिया स्वामी सीवन, अंकित गजभिये, सौरभ तोमर, सागर मगरे, काझी वजिरोद्दीन, मोहसीन शेख व राहुल मंडावकर या अनुभवी पंचांचा समावेश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, शिल्पा मोरे, तुषार आहेर, वरिष्ठ लिपिक सदानंद सवळे, देवगिरी महाविद्यालयाचे राकेश खैरनार तसेच जिल्हा तलवारबाजी संघटना, छत्रपती संभाजीनगर यांनी मोलाचे सहकार्य केले.

१९ वर्षे वयोगटातील विजेते खेळाडू
मुले विभागात छत्रपती संभाजीनगरचे विधाते सिद्धार्थ संतोष (फॉईल – प्रथम), हर्षवर्धन भामरे (द्वितीय), ओमकार पवार (इप्पी – प्रथम) यांनी उत्तम कामगिरी केली. मुलींच्या गटात गायत्री गोटे (फॉईल – प्रथम), झोन्ड हर्षदा शेषराव (सैबर – प्रथम), वैभवी माने (इप्पी – प्रथम) यांसह अनेक खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत विभागाचे नाव उज्ज्वल केले.

सांघिक स्पर्धांमध्ये छत्रपती संभाजीनगरने पुन्हा वर्चस्व राखले असून फॉईल (मुले व मुली) आणि सैबर (मुली) या दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. इप्पी प्रकारात लातूर जिल्ह्याने विजेतेपद मिळवले, तर नागपूर विभागाने सैबर (मुले) प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केले.

या स्पर्धेमुळे राज्यातील शालेय तलवारबाजी स्पर्धेला नवचैतन्य लाभले असून, युवा खेळाडूंच्या कौशल्य, शिस्त आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *