अली रहीम शेखची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

  • By admin
  • November 13, 2025
  • 0
  • 118 Views
Spread the love

ढोरेगाव जिल्हा परिषद शाळेत कौतुक सोहळा थाटात 

छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावचा माजी विद्यार्थी अली रहीम शेख याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये फ्रीस्टाइल १७ वर्ष वयोगटात प्रथम पारितोषिक मिळवत राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा परिवाराने त्याचा व त्याचे वडील रहीम शेख यांचा सन्मानपूर्वक गौरव केला.

या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल यांनी भूषविले. तर अरुण साध्ये, शकुंतला साध्ये, डॉ. महेंद्र बाप्ते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गंगापूरचे तालुका लोन ऑफीसर साईनाथ वाघ, ढोरेगाव शाखेचे अधिकारी बाबासाहेब शिरसाट, सचिन पठाडे, रफिक सय्यद, केंद्र प्रमुख दत्तात्रय दाणेकर, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, संतोष पवार यांची विचार मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अली शेख याचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला. तसेच आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम शाळा परिसरात अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमास ज्ञानेश्वर पठाडे, अभिषेक पठाडे, रवी डोळे, गणपत कांबळे, दिलीप कांबळे, मुक्ताजी कांबळे, ताराचंद कांबळे, नामदेव कांबळे, चंद्रकांत कांबळे, दावीद उमाप, नितीन कांबळे, बंडू भाऊ यांच्यासह पालक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उदे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, मनोज मस्के, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा आणि कल्याणी जगताप यांनी परिश्रम घेतले. अली रहीम शेख याचे यश हे ढोरेगाव व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शाळेचा लौकिक वाढवणारे ठरले आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *