आयआयआयटी पुणे संघाची चमकदार कामगिरी, १० पदकांची कमाई

  • By admin
  • November 14, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

पुणे ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) पुणे संघाने दुसऱ्या इंटर-आयआयआयटी कर्मचारी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १० पदकांची कमाई केली आणि सर्व सहभागी आयआयआयटी संस्थांमध्ये सहावा क्रमांक पटकावला.

विशेष म्हणजे, पीपीपी-मॉडेल अंतर्गत स्थापन झालेल्या सर्व आयआयआयटींपैकी आयआयआयटी पुणेने सर्वोत्तम संस्था म्हणून आपली छाप उमटवली. अॅथलेटिक्स स्पर्धेत आयआयआयटी पुणे संघाने दमदार प्रदर्शन केले.

डॉ सुमित कुमार गुप्ता याने गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवले. रजत खंगार याने ४०० मीटर धावण्यात सुवर्ण, तर १०० व २०० मीटर स्पर्धांमध्ये रौप्यपदके पटकावून प्रभावी वेग दाखवला. जलतरणात डॉ दिपेन बेपारी याने दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह संस्थेचा गौरव वाढवला.

संघात्मक खेळातही आयआयआयटी पुणे चमकले. क्रिकेट संघाने उपविजेतेपद मिळवले, तर तगडी टीमवर्क आणि समन्वयाच्या जोरावर टग ऑफ वॉरमध्ये विजेतेपद पटकावले. यामुळे आयआयआयटी पुणेला अॅथलेटिक्समध्ये द्वितीय क्रमांक, तर एकूण निकालात सहावा क्रमांक मिळाला.संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा यशप्रसंग शक्य झाला.

संपूर्ण पथकाचे नेतृत्व डॉ श्रीकांत साळवे (क्रीडा प्रमुख) आणि रजत खंगार यांनी परिणामकारकपणे सांभाळले.आयआयआयटी पुणेच्या संचालकांसह सर्वांनी विजेत्या पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या उत्साह, टीमवर्क आणि क्रीडाभावाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *