शेंद्रा एमआयडीसी येथे स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहराजवळील शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरिक ऑफिस समोरील रोड ट्रॅकवर मनपा हद्दीबाहेरील जिल्हास्तरीय सायकलिंग (रोड रेस) स्पर्धा १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले आणि मुली या तीनही गटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून जिल्ह्यातील शाळांकडून उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती संयोजक भिकन अंबे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी खेळाडूंनी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळी १० वाजता प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. ही स्पर्धा ऑरिक ऑफिस समोरील रोड ट्रॅक, शेंद्रा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे.
या स्पर्धा संदर्भात अधिक माहितीसाठी भिकन आंबे (9422203319), सचिन बोर्डे (7769998623), गणेश पाळवदे (9518774575) यांच्याशी संपर्क साधावा.
अनिवार्य कागदपत्रे
स्पर्धेत सहभाग घेऊन इच्छिणाऱया खेळाडूंनी मूळ जन्मदाखला सत्यप्रत, पहिली इयत्तेच्या जीआर मधील जन्मनोंदीची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, स्पर्धा आयडी कार्ड आणि मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह खेळाडू सूची अशी कागदपत्रे सोबत ठेवावीत.
महत्त्वाच्या सूचना
ऑनलाईन एन्ट्री आणि प्रवेशिका आणणे अनिवार्य; ऑन-द-स्पॉट एन्ट्री दिली जाणार नाही. प्रत्येक खेळाडूकडे स्वतःची सायकल, दोन्ही ब्रेक, हेल्मेट आणि शूज असणे आवश्यक. चप्पल/सॅंडल परवानगी नाही. विद्यार्थी शिक्षक/कोच किंवा पालकांसह येणे बंधनकारक; शेंद्रा एमआयडीसी परिसरात वाहतूक घनदाट असल्याने सुरक्षा महत्त्वाची. स्पर्धेदरम्यान होणाऱ्या दुखापतीची जबाबदारी खेळाडू, पालक किंवा शिक्षक यांची असेल. १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी पालकांसोबत येणे अनिवार्य. सर्वांनी पाण्याची बाटली, नाश्ता/जेवण सोबत ठेवावे; स्पर्धेस वेळ लागू शकतो.
या जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे युवा सायकलिस्टना कौशल्य प्रदर्शनाची उत्तम संधी लाभणार आहे. सर्व शाळांनी खेळाडूंना सूचना देऊन वेळेत उपस्थित राहण्याची खबरदारी घ्यावी.


