मुंबई, लातूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर खेळाडूंची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले-मुलींसाठी आयोजित ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या विजेत्या खेळाडूंना बक्षिस वितरण उपविभागीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी कन्नड व जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ उदय डोंगरे, राहुल वाघमारे (मुंबई) तसेच विविध जिल्ह्यांतील संघटक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ दिनेश वंजारे यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यस्तरीय तज्ञ पंच अजय त्रिभूवन, पेरिया स्वामी सीवन, अंकित गजभिये, सौरभ तोमर, सागर मगरे, काझी वजिरोद्यीन, मोहसीन शेख व राहूल मंडावकर यांनी परिश्रम घेतले. तसेच क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, शिल्पा मोरे, तुषार आहेर, वरिष्ठ लिपिक सदानंद सवळे, देवगिरी महाविद्यालयाचे राकेश खैरनार आणि जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सहकार्य लाभले.
१७ वर्षे मुलांच्या गटातील विजेते
फॉईल प्रकारात छत्रपती संभाजीनगरच्या स्वराज डोंगरे आणि कार्तिक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय स्थान संपादन केले. मुंबईच्या विनय दुना आणि अमरावतीच्या यशोवर्धन देशमुख यांनी तृतीय स्थान पटकावले. इप्पी प्रकारात लातूरच्या साईप्रसाद जंगवाड (प्रथम), छत्रपती संभाजीनगरच्या आर्यन काकड (द्वितीय), नागपूरच्या आशिष चकोले आणि सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे यांनी प्राविण्य मिळवले. सैबर प्रकारात पुण्याच्या अथर्व बारसे (प्रथम), छत्रपती संभाजीनगरच्या सन्मय क्षीरसागर (द्वितीय), स्पर्ध जाधव आणि नागपूर-भंडारा येथील श्रेयस कुरूंजेकर यांनी चमकदार कामगिरी केली.
मुलींच्या गटातील विजेते
फॉईल प्रकारात छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी वंजारे (प्रथम), कनक भोजने (द्वितीय) तर पुण्याच्या आर्या जाधव व नागपूरच्या आशना चौधरी यांनी तृतीय स्थान मिळवले. इप्पी प्रकारात लातूरच्या जान्हवी जाधव (प्रथम), रोहिणी पाटील (द्वितीय), छत्रपती संभाजीनगरच्या सौम्या साठे व मुंबईच्या रिधीमा सिंग यांनी पदके पटकावली. सैबर प्रकारात पुण्याच्या ज्ञानदा शिरवळ (प्रथम), नागपूर-भंडाराच्या यिशू गभणे (द्वितीय), छत्रपती संभाजीनगरच्या राजनंदिनी तंवर आणि नाशिकच्या मैत्री डोंगरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
सांघिक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने आपला दबदबा कायम ठेवला. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, पुणे, नागपूर, लातूर या संघांनी यशाचा आलेख उंचावत ठेवला. छत्रपती संभाजीनगर व लातूरच्या खेळाडूंनी केलेली दमदार कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली असून राज्यस्तरीय स्पर्धांना चालना देणारी ठरली आहे.


