राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत अंजुषा मगरला दोन पदके

  • By admin
  • November 16, 2025
  • 0
  • 54 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्याजलतरण स्पर्धेत महिला जलतरण साक्षरता अभियान प्रमुख तसेच छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ जलतरणपटू व प्रशिक्षक अंजूषा मगर हिने दोन पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.

या स्पर्धेत अंजूषा मगर हिने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कांस्य अशी दोन पदकांची कमाई केली आहे. महिला जलतरण साक्षरता अभियान प्रमुख व मराठवाडा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या अंजुषा मगर यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ मकरंद जोशी, प्रा शत्रुंजय कोटे, रफीक इजाज सिद्धीकी, कालिदास तादलापुरकर, मीनाक्षी मुलीयार, हिदायत पटेल, नुतन गुट्टे, मधुकर गंगावणे, सारिका लोखंडे, अभय देशमुख, राजेंद्र काळे, अजय दाभाडे, निखिल पवार, पौर्णिमा भोसले, विजय भोसले, वंदना वाघमोडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *