अंबाजोगाई ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय आणि बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या तीन संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावत स्पर्धा गाजवली.
बीड येथील जिल्हा स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेच्या मुलींच्या विभागात चौदा, सतरा व एकोणीस वर्षाखालील गटात योगेश्वरी कन्या शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची निवड विभागीय हॉकी स्पर्धेसाठी झाली आहे.
या खेळाडूंना अंजली रेवडकर व वैष्णवी खाडे यांनी मार्गदर्शन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, गणपत व्यास, ॲड जगदीश चौसाळकर, कमलाकर चौसाळकर, प्रा भीमाशंकर शेटे, ॲड कल्याणी विर्धे, मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी, स्मिता धावडकर, लता सरवदे, शिक्षक प्रतिनिधी, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


