पुणे ः पुणे येथे ए डी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्रभर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या भव्य सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
यामध्ये शिक्षण क्षेत्रातील निस्वार्थ सेवा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी केलेला अविरत प्रयत्न आणि समाजाप्रती दाखवलेली बांधिलकी यांची दखल घेऊन वंदनीय शिक्षिका सुवर्णा दिलीप वाघमोडे यांना मानाचा “महाराष्ट्ररत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक (मुंबई) डॉ प्रिय घजग्राम धुळे, प्राचार्य रेश्माश्री पाटील, एडी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड आणि महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सरचिटणीस प्रा शिवाजीराव खांडेकर उपस्थित होते.
या सन्मान प्रसंगी सुवर्णा वाघमोडे यांच्यासोबत त्यांची मुले निवेदिता आणि सार्थक तसेच रेवनाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीपराव वाघमोडे उपस्थित होते.
मुंबई विभाग संपर्कप्रमुख व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा प्रमोद वाघमोडे यांनी सुवर्णा वाघमोडे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या कर्तृत्वाने शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


