
रविवारी वितरण
नाशिक : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात पंचवटी मधील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक किशोर राजगुरु यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आता आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (५ जानेवारी) दुपारी २.३० वाजता रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ शालिमार नाशिक येथे संपत्र होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये किशोर राजगुरु यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.
तसेच या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या उपाध्यक्षा डॉ. योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य, डॉ. सुचिता सोनवणे पर्यवेक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.