
यवतमाळ : यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत आठ विभागातील १८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
नेहरु स्टेडियम येथे १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातील राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्र डॉजबॉल संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ. हनुमंतराव लुंगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दुर्गेश कुंटे, जिल्हा डॉजबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनंत पांडे, उपाध्यक्ष राजू जॉन, महाराष्ट्र डॉजबॉल तांत्रिक समिती सदस्य अशोक परीट, पुणे डॉजबॉल असोसिएशनचे सचिव अमन डोमाले, शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश जोशी, संजय बट्टावार, पर्यवेक्षक संजय सातारकर, पियुष भुरचंडी, गिरिराज गुप्ता आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागातील १८० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत डॉजबॉलच्या नवीन नियमाप्रमाणे प्रथमच पाच बॉलवर तसेच सिंथेटिकच्या मैदानावर डॉजबॉलची स्पर्धा प्रथमच घेण्यात आली.
यावेळी अँग्लो हिंदी हायस्कूलच्या खेळाडूंनी प्रशिक्षक संजय सातारकर यांच्या मार्गदर्शनात जम्प रोप खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. मान्यवरांच्या हस्ते चेन्नई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेत महाराष्ट्राला मुला मुलींच्या दोन्ही गटात सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक आशिष जगताप (बीड) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. निलेश भगत यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांनी मानले. या स्पर्धेत पंच म्हणून धीरज तायडे, आशिष जगताप, स्वप्नील डंभारे, राजेश सुनानी, अमित अग्रे, अनिल पवार, योगेश टाकमोघे, सोमनाथ दगडघाटे, केतन जगताप, गिरीराज गुप्ता, अमोल जयसिंगपुरे, श्रीरंग रानडे, भार्गव रानडे, तन्मय डोळे यांनी काम पाहिले.