सोलापूर योगासन स्पर्धेत संजनाला सुवर्ण, वैष्णवीला कांस्य पदक 

  • By admin
  • January 5, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

सोलापूर : सोलापूर जिल्हा योगासन स्पर्धेत अवंती नगर येथील लोकमंगल प्रशालेच्या संजना बावळे हिने सुवर्ण तर वैष्णवी भोसले हिने कांस्य पदक पटकाविले.

जिल्हा योग परिषद कित्तूर चन्नमा प्रतिष्ठान व रोटरी क्लब यांच्यावतीने ही स्पर्धा डफरीन चौक येथील नूमवी शाळा घेण्यात आली. त्यामध्ये नववी ते दहावी गटातून संजनाला प्रथम सुवर्णपदक, प्रमाणपत्र व २०१ रुपयांचे बक्षीस तिला मिळाले व वैष्णवीने कांस्यपदक पटकावले. तिला एकशे एक रुपये व प्रमाणपत्र मिळाले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख, अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे, कार्यकारी संचालक अभयसिंह साठे व मुख्याध्यापिका शुभांगी साठे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *