
सांगोल्याचे प्रशांत म्हस्के संघ व्यवस्थापक
सोलापूर : सांगोला शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशन सचिव व सोलापूर शहर जिल्हा हौशी असोसिएशनचे सहसचिव प्रशांत मस्के यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी संघव्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे.
भावनगर येथे होणाऱ्या ७४व्या सिनियर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुरुषांच्या संघव्यवस्थापक म्हणून ते सहभागी होतील. त्यांचे संघटनेचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सचिव एम. शफी, नितीन चपळगावकर, जुबेर शेख, अनिल जाधव, प्रा. महेश डेंबरे, अनिल देशपांडे, सादत खरादी, बुजरूक सगरी, श्रीधर गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.