
सोलापूर : सोलापूर येथील पी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल संघाने जिल्हा योगासन स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली. नुमवि येथे जिल्हा योग परिषद राणी कित्तुर चन्नम्मा प्रतिष्ठान व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत श्रेया हरके (तृतीय), आरोही कटके (तृतीय), श्रेया चव्हाण, समृद्धी वाघमारे (उत्तेजनार्थ), सानिका शिंदे (तृतीय) यांनी आपल्या गटात यश संपादन केले.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अजित पाटील, रोहन घाडगे, सोमनाथ यांचे मार्गदर्शन लाभले. श्राविका संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवई शहा, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, पर्यवेक्षक जयेश शिरढोणे, कल्पना रमावत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.