
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास
नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरातील खेळाडू देशाचा गौरव ठरतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
या प्रसंगी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘विदर्भाच्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी अधिक जोमाने खेळात पारंगत व्हावे या उद्देशाने विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमंत्रित करण्यात येत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुढील काळात नागपुरातील खेळाडू देशाचा गौरव वाढवतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
१०० कोटींची मागणी
शहरातील जास्तीत जास्त मुलांनी मैदानात येऊन खेळावे यासाठी मैदानांचा विकास करण्यासाठी विकास करण्याची गरज आहे असे सांगून नितीन गडकरी यांनी राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली केली. पुढील काळात तालुकास्तरावर देखील काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी आयोजक समितीला केली. क्रीडा संघटनांनी देखील खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी सर्वांनी एक होऊन कार्य करावे खेळाडूंनी खेळांचे नियम, पंचांचा निर्णय याचा सन्मान करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विशेष अतिथी म्हणून भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष झांजरिया, मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण, ऑलिम्पियन नितेश कुमार, सुमित अंतिम, अरविंदर सिंग मार आणि अवनी लेखारा उपस्थित होते. तसेच आमदार प्रवीण झटके, आमदार मोहन मते खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संजय संदीप जोशी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र बंटी कुकडे, महोत्सवाचे सचिव डॉ. आंबुलकर यांची विशेष उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र बंटी कुकडे, माजी आमदार नागो गाणार, मल्लिकार्जुन रेड्डी जयप्रकाश गुप्ता, माजी नगरसेवक नरेंद्र बाल्या बोरकर, दीपक चौधरी, नगरसेविका श्रद्धा पाठक यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे ६१ खेळांच्या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी विविध ६१ खेळांच्या क्रीडा संघटनांना महोत्सवाचे ध्वज प्रदान करण्यात आले.
१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन नागपूर शहरात करण्यात येत आहे. क्रीडा महोत्सव कसा असावा हे नितीन गडकरी यांनी देशाला दाखवून दिले आहे. सात वर्षांपूर्वी छोट्या स्वरूपात असलेला हा महोत्सव आता क्रीडा महोत्सव रूपात आयोजित होत आहे. खासदार क्रीडा महोत्सव हा नागपूर आणि देशासाठी मोठी देण आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.