बजाजनगर ज्युदो क्लबच्या खेळाडूंनी पटकावली २० पदके

  • By admin
  • January 5, 2025
  • 0
  • 106 Views
Spread the love

आठ सुवर्णपदक विजेत्यांची राज्य ज्युदो स्पर्धेसाठी निवड 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो स्पर्धेत बजाजनगर ज्युदो क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत २० पदकांची कमाई केली. या  स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बजाजनगर ज्युदो क्लबच्या ८ खेळाडूंची राज्य ज्युदो स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटनेने आयोजित केलेल्या सब ज्युनियर जिल्हा ज्युदो स्पर्धेत बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत वेगवेगळ्या गटात ८ सुवर्णपदक, ८ रौप्य व ४ कांस्य पदक अशी एकूण २० पदके पटकावली. सुवर्णपदक विजेत्या ८ खेळाडूंची पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्य ज्युदो स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.

या शानदार कामगिरीबद्दल बजाजनगर ज्युदो क्लबच्या वतीने विजयी खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई , रामकिशन मायंदे, लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ. गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, विजय साठे, अमित साकला, संजय परळीकर, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार, बजाजनगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, विकास देसाई, शैलेश कावळे, सागर घुगे, राज जंगमे, कल्याणी शेटकर, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटील, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, धनश्री वाळूंज, शाळेचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पदक विजेते खेळाडू 

सुवर्णपदक : आरोही जाधव, अपूर्वा म्हसे, त्रिवेणी काळे, इंद्रायणी वाघमारे, राजश्री मुसळे, चेतन समिंद्रे, विराज पवार, विशाल मुंडे.

रौप्य पदक : शारदा शेळके, निशा वाघ, साधना बेडगे, आराध्या जाधव, सोहम पोपटकर, मयूर बनकर, समर्थ घुगे, अविनाश सुरवसे.

कांस्य पदक : समृद्धी चव्हाण, सार्थक हिंगमिरे, सुयोग बडे, साई कदम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *