
उदयपूर येथे सात जानेवारीपासून स्पर्धा, रुपाली जाधवची कर्णधारपदी निवड
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ जाहीर करण्यात आला. विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ उदयपूर येथे रवाना झाला आहे.
विद्यापीठ महिला संघाच्या कर्णधारपदी रूपाली जाधव आणि उपकर्णधार म्हणून स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ ते १४ जानेवारी या कालावधीत सुकाडीया विद्यापीठ, उदयपूर येथे होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघामध्ये रूपाली जाधव, स्वाती पाटील, श्रेया रापेल्ली, दिपाली उप्पाध्याय, शुभांगी मिश्रा, पूजा जमदाडे, स्नेहल मगर, कल्याणी खंडागळे, सुरेखा अडे, मोनिका मिसाळ, प्रतीक्षा डामसे, अनिशा बिक्कड, श्रुती देशमाने, महीमा जक्कल, निलोफर खान या खेळाडूंचा समावेश आहे. संघा सोबत प्रशिक्षक म्हणून कांचन फाजगे तर संघ व्यवस्थापक म्हणून शितल वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संघाला कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप, छत्रपती संभाजीनगर झोन सचिव डॉ. सुहास यादव, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, अभिजीत सिंग दिक्कत, गणेश कड, डॉ. रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.