
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित सीनियर महा टी २० क्रिकेट स्पर्धेत पीडीसीए संघाने रायगड संऑघाचा पराभव केला. या सामन्यात पीडीसीए संघाचा कर्णधार यश नहार याने धमाकेदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
कर्णधार यश नहार याने ६० चेंडूत १० चौकार व ७ उत्तुंग षटकार ठोकत १०७ धावांची खेळी केली. यशच्या या आक्रमक शतकाने पीडीसीए संघाने विजय साकारला. या स्पर्धेत यश नहार याने विलास सीनियर संघाविरुद्ध ६० चेंडूत १२१ धावांची वादळी शतकी खेळी केली होती. तसेच पश्चिम विभाग संघाविरुद्ध खेळताना यश याने ६१ चेंडूत ११५ धावा फटकावल्या होत्या. या स्पर्धेत यश नहार याने सलग तीन शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा यश हा या स्पर्धेतील एकमेव फलंदाज आहे.