
छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय शालेय मनपा अंतर्गत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत लिटल वंडर हायस्कूल, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या संघांनी विजेतेपद पटकावले.
मनपा अंतर्गत गटात लिटल वंडर हायस्कूल संघाने विजेतेपद संपादन केले. मनपा हद्दीबाहेरील गटात शरणापूर येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल संघाने अजिंक्यपद मिळवले. दोन्ही विजेते संघ बीड येथे ७ व ८ जानेवारी रोजी होणाऱ्या विभागीय शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव सत्येंद्र चपाटे यांची उपस्थिती होती. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक योगेश पवार व कृष्णा सुरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.