
छत्तीसगड महिला संघावर ३९ धावांनी विजय
नागपूर : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत विदर्भ महिला संघाने छत्तीसगड महिला संघाचा ३९ धावांनी पराभव केला.
या स्पर्धेची सुरुवात विदर्भ महिला संघाने विजयाने केली. प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने २० षटकात सात बाद १३६ धावा काढल्या. त्यात सायली शिंदे हिने सर्वाधिक ३२ धावा फटकावल्या. मानसी पांडे (३०), प्रेरणा रणदिवे (२६) आणि आयुषी ठाकरे (२१) यांनी उपयुक्त फलंदाजी करत सुरेख योगदान दिले.
प्रत्युत्तरात छत्तीसगड महिला संघ १९.४ षटकात ९७ धावांवर सर्वबाद झाला. तन्वी पवित्रकर हिने १२ धावांत तीन विकेट घेतल्या. जान्हवी रंगनाथन हिने १३ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ : २० षटकांत सात बाद १३६ (सायली शिंदे ३२, मानसी पांडे ३०, प्रेरणा रणदिवे २६, आयुषी ठाकरे २१, अंशी अग्रवाल ३-२१) विजयी विरुद्ध छत्तीसगड : १९.४ षटकांत सर्वबाद ९७ (मानसी मौर्य २१, ऐश्वर्या सिंग २१, तन्वी पवित्रकर ३-१२, जान्हवी रंगनाथन २-१३).