राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

  • By admin
  • January 7, 2025
  • 0
  • 80 Views
Spread the love

पुणे ग्रामीणच्या वैभवी जाधव, अनुज गावडे यांच्याकडे नेतृत्व

मुंबई : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित होणाऱ्या ५०व्या कुमार आणि कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. कुमारी गटाचे नेतृत्व पुणे ग्रामीणच्या वैभवी जाधव हिच्याकडे, तर कुमार गटाचे नेतृत्व अनुज गावडे याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सांगलीवाडी, सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून हे संघ निवडण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथे रोशनबाद बंदिस्त क्रीडा संकुलात ८ ते ११ जानेवारी या कालावधीत खेळवली जाईल.  

राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी महाराष्ट्राचा कबड्डी संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास राज्य कबड्डी असोसिएशनने व्यक्त केला आहे.

कुमारी गट संघ

वैभवी जाधव (कर्णधार), साक्षी रावडे, प्रतिक्षा लांडगे, सृष्टी मोरे (सर्व पुणे ग्रामीण), साक्षी गायकवाड, रेखा राठोड, भूमिका गोरे (सर्व पिंपरी चिंचवड), श्रेया गावंड (ठाणे), वैष्णवी काळे (अहमदनगर), मोनिका पवार (जालना), आरती चव्हाण (परभणी), कादंबरी पेडणेकर (मुंबई शहर पूर्व). प्रशिक्षक : महेंद्र माने, व्यवस्थापिका : निकिता लाड.

कुमार गट संघ

अनुज गावडे (कर्णधार), महेश मोने, जयंत काळे (सर्व पुणे ग्रामीण), आफताब मंसुरे, रोहन तुपारे, आदित्य पिलाणे (सर्व ठाणे शहर), विजय तारे (परभणी), समर्थ देशमुख (कोल्हापूर), असीम शेख (नंदुरबार), आदित्य येसगुडे (सांगली), )ओम कुदळे (मुंबई उपनगर पश्चिम), राज मोरे (रायगड). प्रशिक्षक : आयुब पठाण, व्यवस्थापक : वैभव पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *