
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे फुलंब्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचा मेसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा प्रवीण आव्हाळे, राज्य कार्याध्यक्ष हनुमान भोंडवे, राज्य कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील मगर पाटील, जिल्हा सचिव प्रा अक्षय न्यायाधीश व सदस्य ॲड ऋषिकेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.