
ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे यांच्यातर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या २१ व्या श्री मावळी मंडळ आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे पोलिस स्कूलने शानदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत ठाण्यातील ५० शाळांमधून १ हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत मुलांच्या गटात ठाणे पोलिस स्कूल संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल संघाने विजेतेपद मिळवले.
उद्घाटन समारंभ
स्पर्धेचे उद्घाटन श्री मावळी मंडळ हायस्कूलचे सीईओ आणि मराठी साहित्य अकॅडमी सदस्य नरेंद्र पाठक यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभात डॉ दीपक साबळे (मुख्याध्यापक, भारत कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, बदलापूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सांघिक विजेते आणि उपविजेते
सांघिक जनरल चॅम्पियनशिप विजेता : ठाणे पोलिस स्कूल (१५४ गुण – १६ सुवर्ण, १६ रौप्य, २६ कांस्य).
सांघिक उपविजेता : श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल (१२० गुण – १७ सुवर्ण, ७ रौप्य, १४ कांस्य).
सर्वोकृष्ट खेळाडू : प्रणव खेडकर (ठाणे पोलिस स्कूल), कामाक्षा दुधाडे (ठाणे पोलिस स्कूल).
वैयक्तिक चॅम्पियनशिप विजेते
६ वर्षांखालील : आयांश आना (मुले, इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल), दिलीशा सत्रा (मुली, वसंत विहार हायस्कूल).
८ वर्षांखालील : जियांश पाटील (मुले, अंबर इंटरनॅशनल), निष्का मनुधने (मुली, सुलोचना देवी सिंघानिया).
१० वर्षांखालील : अर्चित मोरे (मुले, सुलोचनादेवी सिंघानिया), बिरवटकर पर्ल (मुली, वसंत विहार हायस्कूल).
१२ वर्षांखालील : युग पाटील (मुले, श्री मा विद्यालय), इरा जाधव (मुली, सुलोचनादेवी सिंघानिया).
१४ वर्षांखालील : अनिरुद्ध नंबोदरी (मुले, सुलोचनादेवी सिंघानिया), दीपिका सखदेव (मुली, सरस्वती स्कूल).
१६ वर्षांखालील : सूर्यराव धैर्य (मुले, सुलोचनादेवी सिंघानिया), रिद्धी माने व साईशा पवार (मुली, होलीक्रॉस कॉन्व्हेंट).
नवीन विक्रम
या स्पर्धेत खेळाडूंनी अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले. ६ वर्षांखालील उभी उडी : अयंश सिंह (वसंत विहार हायस्कूल) – १.५७ मीटर. ८ वर्षाखालील मुलींचा गट ५० मीटर धावणे : जियांश पाटील (अंबर इंटरनॅशनल) – ७.९ सेकंद. मुले १२ वर्षांखालील भालाफेक : शुभ चितळे (ठाणे पोलिस स्कूल) – २४.२० मीटर.
संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, खजिनदार रिक्सन फर्नांडिस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या स्पर्धेने ठाण्यातील शालेय खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.