
बीसीसीआय सचिवांना यांना कठोर वागण्याचा सल्ला
मुंबई : लागोपाठ दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाच्या निवडीवरून मोठा गदारोळ उठला आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांना खराब कामगिरीमुळे नवीन संघ निवडण्याबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना कठोर आदेश जारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या स्थितीचा अंदाज यावरून लावता येईल की, गेल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवला गेला आहे. प्रथम, न्यूझीलंड हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला देश बनला ज्याने भारतीय संघाला स्वतःच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले. आता ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर करंडक मालिका ३-१ ने जिंकली. दरम्यान, जय शाह यांच्या जागी सध्या बीसीसीआयमध्ये सचिवपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवजित सैकिया यांना खराब कामगिरीमुळे नवीन संघ निवडण्याबाबत मुख्य निवडकर्ता अजित यांना कठोर आदेश जारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वीच विराट कोहली आणि रोहित शर्मावर टीकेची झोड उठली होती. पर्थ कसोटीत कोहली याने निश्चितपणे १०० धावांची शतकी खेळी खेळली, असे असूनही संपूर्ण मालिकेत तो केवळ १९० धावा करू शकला. रोहित शर्माची अवस्था त्याहूनही वाईट होती, कारण त्याने ५ डावात केवळ ३१ धावा केल्या. कर्णधार रोहितचा फॉर्म इतका खराब आहे की, सप्टेंबर पासून खेळल्या गेलेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १६४ धावा केल्या आहेत. परिणामी, दबावाखाली त्याला सिडनी कसोटीतून वगळावे लागले.
बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा १२ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. त्याआधी एका मीडिया संस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘खूप चुकीचा संदेश पाठवला जात आहे. बीसीसीआयला देशभरात क्रिकेट पुढे न्यायचे आहे आणि ते पुढे जातानाही पाहिले पाहिजे. आता वेळ आली आहे. खेळाडूंनी बीसीसीआयला कठोर संदेश द्यायला हवा की या खेळापेक्षा कोणताही खेळाडू आता नवीन संघ निवडण्याची गरज नाही आणि बीसीसीआयच्या नवीन सचिवांनी आगरकरला बोलावून कडक संदेश द्यावा.
भारताची पुढची मालिका
भारतीय संघाला २०२५ साली इंग्लंडविरुद्ध पहिली मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघाचा भारत दौरा २२ जानेवारीपासून सुरू होणार असून दोन्ही संघांमध्ये पाच टी २० आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेद्वारे भारतीय संघ १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत सुधारणा करू शकतो.