
दिल्ली, छत्तीसगड संघांचा अंतिम फेरीत प्रवेश
जळगाव : राष्ट्रीय आंतर शालेय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली आणि छत्तीसगड या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. महाराष्ट्र संघाने दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करुन दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी निर्माण केली आहे.
भारतीय शालेय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय १७ वर्षांखालील मुले- मुली सॉफ्टबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुरू असलेल्या सामन्यांसाठी अतिरिक्त सीईओ रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे यांनी मैदानावर जाऊन संघातील खेळाडूंना शुभेच्छा देत उपांत्य सामन्याची सुरुवात केली.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहसचिव गोकुळ तांदळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे, प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाच्या प्रणव जाधव, श्रीराज पाटील, तुषार राठोड, तनिष रामावात, कुणाल रायसिंह यांनी शानदार खेळ केला. मुलींच्या गटात मनाली कुलकर्णी, कोमल चौधरी, केतकी इखे, वैष्णवी जाधव यांनी महाराष्ट्र संघास विजय मिळवून देण्यास आपले महत्त्वाचे योगदान दिले.
या सामन्यांची तांत्रिक बाजू पंच समितीचे मुकुल देशपांडे, पंच प्रमुख गणेश बेटूदे, अक्षय येवले, संतोष आवचार, किशोर काळे, जयंत जाधव, प्रसाद कुलकर्णी, विजय, शिवाजी पाटील, कल्पेश कोल्हे, धीरज बाविस्कर, गौरव चौधरी, वैभव बारी, वेद पाटील, मोहित आवसेकर यांनी पंच म्हणून भूमिका निभावली. गुणलेखन कोमल तायडे व नेहा देशमुख यांनी केले.
उपांत्य सामन्यांचे निकाल
मुलींचा गट : महाराष्ट्र विजयी विरुद्ध तेलंगणा (१-०), दिल्ली विजयी विरुद्ध ओडिशा (१-०).
मुलांचा गट : महाराष्ट्र विजयी विरुद्ध पंजाब (१-०), छत्तीसगड विजयी विरुद्ध दिल्ली (५-०).