छत्रपती संभाजीनगर : राज्य ज्युनियर मुले आणि सब ज्युनियर मुलींची स्पर्धा अनुक्रमे इस्लामपूर (सांगली) आणि पनवेल येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी १२ जानेवारी रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
निवड चाचणी स्पर्धा १२ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मातोश्री रमाबाई आंबेडकर एन सेवन रामलीला मैदान सिडको या ठिकाणी होणार आहे. या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ संजय मोरे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त सचिव प्रा एकनाथ साळुंके यांनी केले आहे.
निवड समिती डी आर खैरनार, आशिष कान्हेड, सागर तांबे, अभिजीत साळुंके हे काम पाहणार आहेत. निवड चाचणी सुरळीत पार पाडण्यासाठी गणपत पवार, सागर तांबे, रेखा साळुंके, अभिजीत साळुंके, बाजीराव भुतेकर, सुयश नाटकर, रुपाली शेळके, पांडुरंग कदम, यशवंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.