
क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते दक्षचा सत्कार
नागपूर (सतीश भालेराव) : स्पोर्ट्स जनलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात आयर्नमॅन दक्ष खंते याचा सन्मान करण्यात आलेला आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, तसेच स्पोर्ट असोसिएशन ऑफ नागपूर माजी अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अमित संपत, दक्षचे आई वडील अमोल खंते हे उपस्थित होते.
आयर्नमॅन ही स्पर्धा पश्चिम ऑस्ट्रेलिया बसल्टण येथे नुकतीच पार पडली. विसाव्या जागतिक पूर्ण अंतराची आयर्नमॅन ही शर्यत यावर्षी पूर्ण करून जगातील सर्वात तरुण आयर्नमॅन ठरलेला दक्ष खंतेचा क्लब ऑफ नागपूर येथे सत्कार करण्यात आला आहे. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी आयर्नमॅन दक्ष खंते याचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर स्पोर्ट्स शिवाय पर्याय नाही. पुढील येणाऱ्या वर्षात स्पोर्ट्स इंडस्ट्री म्हणून विकसित होणार आहे. २०३६ चे ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्यात येईल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
डॉ. अमित संपत यांनी दक्ष खंते याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रास्ताविक केले तर वरिष्ठ क्रीडा पत्रकार डॉ. राम ठाकूर यांनी आभार मानले.
यावेळी दक्ष खंते याने मेकिंग ऑफ आयर्नमॅनचा संपूर्ण प्रवास उलगडला. आई-वडिलांचे प्रोत्साहन प्रशिक्षक डॉ. अमित संपत यांचे मार्गदर्शन आणि कठोर मेहनत, मानसिक सुदृढता या बळावर आयर्नमॅन किताब संपादन केला असे दक्ष याने यावेळी सांगितले.