
१५ जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ, १६ संघांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) आणि एएसएम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या मसिआ प्रीमियर लीग सिझन ४च्या ट्रॉफींचे अनावरण एका शानदार सोहळ्यात करण्यात आले.
हॉटेल रेड वेल्वेट येथे मसिआ प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकाचे तसेच ट्रॉफीचे अनावरण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक एएसएम इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक श्रीधर नवघरे आणि मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
मसिआ प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघानी प्रवेश निश्चित केला असून १५ ते ३१ जानेवारी दरम्यान सिडको एन २ येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना तसेच प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे.
एएसएम इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक श्रीधर नवघरे हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तसेच सानिया मोटर्स, रेऑन इल्युमिनेशन, सीए सचिन घायाळ शुगर, मधुरा इस्टेट, ऋषिकेश इनफ्रास्ट्रक्चर, लाईफ लाइन मेडिकल डिव्हायसेस, किर्दक ऑटोकॉम, दिग्विजय इंडस्ट्रीज, एक्स झोन ट्रान्सपोर्ट सर्विसेस, एआयटीजी, सीमेन्स, अँडरेस हौसर, कॅन पॅक, प्रीमियम ट्रान्समिशन, कुरिया, धनंजय ऑटो यांनी स्पर्धेतील संघाचे यजमानपद स्वीकारले आहे. तसेच स्पर्धेच्या सहयोगी प्रायोजकत्व काळे ग्रुप यांनी घेतले आहे तसेच स्पोर्ट्स पार्टनर म्हणून प्रल्हाद स्पोर्टस हे आहेत.
स्पर्धेच्या चषक अनावरण प्रसंगी मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, सचिव राजेंद्र चौधरी, सहसचिव सचिन गायके, कोषाध्यक्ष विरेन पाटील, सर्जेराव साळुंके, प्रसिद्धी प्रमुख सुरेश खिल्लारे, सह प्रसिद्धी प्रमुख जगदीश जोशी, उद्योग संवादचे संपादक सुदीप अडतीय, सह संपादक रोहण येवले, कार्यकारिणी सदस्य विकास पाटील, दुष्यंत आठवले, मिलिंद कुलकर्णी, मंगेश निटुरकर, दिलीप चौधरी, राजेश विधाते, श्रीकांत सूर्यवंशी आणि तसेच सहभागी टीमचे कॅप्टन उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन मसिआ स्पोर्ट्स कमिटी संयोजक अजिंक्य पाथ्रीकर, तसेच कमिटी सदस्य संदीप पाटील, अमित राजळे, राहुल घोगरे, राजेंद्र मगर, निखिल कदम, मयूर चौधरी, निकित चौधरी, केतन गोडबोले, सूरज चामले, अमन जाधव, चैतन्य जाधव, गिरीश खत्री यांनी केले आहे, असे प्रसिद्धी प्रमुख सुरेश खिल्लारे आणि सहप्रसिद्धी प्रमुख जगदीश जोशी कळवले आहे.