
एमसीए महा टी २० क्रिकेट स्पर्धा
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए महा टी २० क्रिकेट स्पर्धेत जालना संघाने अटीतटीच्या सामन्यात सिंधुदुर्ग संघाचा १३ धावांनी पराभव केला.
गहुंजे येथील एमजीए २ मैदानावर हा सामना झाला. जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १४१ धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सिंधुदुर्ग संघ २० षटकात नऊ बाद १२८ धावा काढू शकला. जालना संघाने हा सामना १३ धावांनी जिंकला.
या सामन्यात हर्ष आमने (४७), यश घाडी (४५), प्रज्ज्वल राय (२९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत निखिल नाईक (४-२०), सय्यद शोएब (३-२३) व व्यंकटेश काणे (२-२९) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
संक्षिप्त धावफलक : जालना : २० षटकात आठ बाद १४१ (प्रज्ज्वल राय २९, व्यंकटेश काणे २८, आर्यन गोजे १९, लक्ष बाबर पाटील १५, वेदांत देव्हाडे ७, आकाश राठोड नाबाद १२, निखिल नाईक ४-२०, विशाल गावित २-२४, असादुल्लाह खान गिरकर १-२६, तन्मय चिंदारकर १-१०) विजयी विरुद्ध सिंधुदुर्ग : २० षटकात नऊ बाद १२८ (हर्ष आमने ४७, अबू भाडगावकर १५, यश घाडी ४५, सय्यद शोएब ३-२३, व्यंकटेश काणे २-२९, ओमकार पातकळ १-१९).