
विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या क्रीडा महोत्सवात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर तर स्वाती पगडे यांनी महिला गटातील विजेतेपद जिंकले.
विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, क्रिकेट, रस्सीखेच व संगीत-खुर्ची पुरुष व महिला गटांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्पर्धेत एकूण ६७ पुरुष खेळाडू व महिला गटातून एकूण २२ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. बॅडमिंटन स्पर्धा एकेरी गटात बाद पद्धतीने खेळविण्यात आली. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. पुरुष गटात कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी विजेतेपद पटकावले. डॉ विनय लोमटे (केमिकल टेक्नोलॉजी) यांनी उपविजेतेपद संपादन केले. अजिंक्य चव्हाण यांनी तिसरा क्रमांक मिळवला तर डॉ प्रवीण एन्नावार यांनी चौथा क्रमांक संपादन केला.
बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात स्वाती पगडे (पीजी फेलोशीप) यांनी अजिंक्यपद मिळवले. जिज्ञासा वानखेडे यांनी उपविजेतेपद मिळवले. डॉ सोनाली क्षीरसागर (एनएसएस समन्वयक) यांनी तिसरे स्थान मिळवले. पद्मा तायडे (वाणिज्य व व्यवस्थापन) यांनी चौथा क्रमांक संपादन केला.
बॅडमिंटन स्पर्धा डॉ सुनील गायसमुद्रे यांच्या देखरेखीत संपन्न झाली. डॉ कैलास पाथ्रीकर, डॉ संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ संदीप जगताप, डॉ मसुद हाश्मी, सुरेंद्र मोदी व गणेश कड यांनी पुढाकार घेतला होता.