
नाशिक : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेत मनमाडची आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे दोन सुवर्णपदके जिंकून स्पर्धा गाजवली.
आकांक्षा व्यवहारे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना ४५ किलो वजनी गटात ६९ किलो स्नॅच ८० किलो व क्लीन जर्क १४९ किलो वजन उचलून युथ आणि ज्युनियर या दोन्ही गटात सुवर्ण पदके पटकावत शानदार कामगिरी बजावली आहे.
अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स लीग स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी स्टेडियम ब्रह्मपुर ओडिशा येथे करण्यात आले आहे. आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, विजय रोहीला यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस एस पोतदार, वागदर्डी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भराडे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी आकांक्षाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.