छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व टीआरएस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (१२ जानेवारी) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बुद्धिबळ स्पर्धा अंडर ११, अंडर १५ अशा दोन गटात होणार आहे. दोन्ही गटात प्रथम एक हजार रुपये, द्वितीय ७५० रुपये, तृतीय ५०० रुपये, चतुर्थ ४०० रुपये अशी रोख पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. पुढील काळात अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा दर महिन्याला दुसऱ्या रविवारी घेण्याचा टीआरएस फाऊंडेशनचा मानस आहे.
ही बुद्धिबळ स्पर्धा चेस लँड, प्लॉट नंबर ७, चित्रकूट व्हॅली, बजाज गेटसमोरील रोड, पाटोदा चौक जवळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्या आले आहे. अधिक माहितीसाठी ९८२२५०८७३७, ९९२३६९६४१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.