कल्याणचे क्रीडा शिक्षक भूषण जाध‌व सोलापूर महापालिका क्रीडा अधिकारीपदी

  • By admin
  • January 10, 2025
  • 0
  • 65 Views
Spread the love

कल्याण : कल्याणचे क्रीडा शिक्षक डॉ भूषण जाधव हे सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारीपदी नुकतेच रुजू झाले आहेत.

तलवारबाजी या खेळाचे एनआयएस प्रशिक्षक असणारे डॉ भूषण जाधव हे कल्याणच्या सेकंड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. तलवारबाजी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्यांनी मजल मारली आहे. तलवारबाजी खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या सर्व कार्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेने त्यांची सरळ क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

डॉ भूषण जाधव हे मूळचे छत्रपती संभाजीनगर शहरातील आहेत. भूषण जाधव यांनी लहानपणापासूनच डॉ उदय डोंगरे, अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी या खेळामध्ये आपले करिअर घडवले आहे. कुटुंबातूनही त्यांना या खेळासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे त्यांनी तलवारबाजी या खेळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्पर्धां बरोबर तलवारबाजी प्रशिक्षणासाठी विदेश दौरे देखील केले आहेत. या खेळाचे एनआयएसचे पहिले प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी राज्यात मान पटकावला.

तलवारबाजी खेळामध्ये त्यांना डॉ उदय डोंगरे, अशोक दुधारे, सेक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अल्बिन अँथनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल त्यांचे डॉ उदय नाईक, प्रा लक्ष्मण इंगळे, अंकुर आहेर, अविनाश ओंबासे, प्रताप पगार, राम म्हात्रे, विश्वास गायकर, विजय सिंग, महादेव क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *