इंग्लंड संघाविरुद्ध वन-डे मालिकेत भारताचे वर्चस्व

  • By admin
  • January 10, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

गेल्या ४० वर्षांत भारताने एकही वन-डे मालिका गमावलेली नाही

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात टी २० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय संघाने गेल्या ४० वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकही वन-डे मालिका गमावलेली नाही. यावेळीही काहीतरी आश्चर्यकारक घडू शकते.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पांढऱ्या चेंडूचा सामना खेळला जाईल. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत ५ टी २० आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जातील. प्रथम ५ सामन्यांची टी २० मालिका असेल. त्यानंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेपूर्वी भारताने गेल्या ४० वर्षांपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही.

भारतीय भूमीवर इंग्लंड संघाचा एकदिवसीय सामन्यांचे रेकॉर्ड खूप खराब आहे. गेल्या ४० वर्षांत इंग्लंडने भारतात भारताविरुद्ध एकही एकदिवसीय मालिका जिंकली नाही. या काळात भारतात दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय मालिका अनिर्णित राहिल्या आहेत, परंतु इंग्लंड संघाला विजय मिळवता आलेला नाही. अशा परिस्थितीत यावेळी भारतीय संघावर ४० वर्षांचा विक्रम अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी असेल. १९८४-८५ मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध भारतीय भूमीवर शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती.

भारताने जिंकले ५८ सामने 

भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत १०७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा दिसतो. भारतीय संघाने ५८ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. तर ३ सामने अनिर्णीत राहिले आणि २ सामने बरोबरीत सुटले.

मालिकेचे वेळापत्रक 

पहिला टी २० : ईडन गार्डन्स, कोलकाता (२२ जानेवारी)

दुसरा टी २० : एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई (२५ जानेवारी)
तिसरा टी २० : सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम राजकोट (२८ जानेवारी)
चौथा टी २० :  महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम पुणे (३१ जानेवारी)

पाचवा टी २० : वानखेडे स्टेडियम मुंबई (२ फेब्रुवारी)

एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय सामना : नागपूर (६ फेब्रुवारी)

दुसरा एकदिवसीय सामना : कटक (९ फेब्रुवारी)
तिसरा एकदिवसीय सामना : अहमदाबाद (१२ फेब्रुवारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *