
छत्रपती संभाजीनगर : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या आरोही जाधव हिने चमकदार कामगिरी बजावत कांस्यपदक पटकावले.
बालेवाडी क्रीडा संकुलात महाराष्ट्र ज्युदो संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर ज्युदो स्पर्धेत बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील वाळूज येथील आरोही जाधवने १ कांस्य पदक संपादन केले. आरोहीला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
पदक विजेत्या आरोही जाधवचे राज्य ज्युदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव शैलेश टिळक, तांत्रिक कमिटीचे सचिव दत्ता आफळे, प्रमोद संवत्सर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ. गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भास्कर जाधव, दीप्ती शेवतेकर, भीमाशंकर नावंदे, अमित साकला, झिया अन्सारी, विजय साठे, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार, कुणाल गायकवाड, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, नंदमूरी श्रीनिवास, अनिल पवार, नामदेव दौड, मनोहर देवानी, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, शैलेश कावळे, सागर घुगे, आदित्य अंभोरे, उषा अंभोरे, कल्याणी शेटकर, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटिल, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, धनश्री वाळुंज, मुख्याध्यापक एस. एस. बडे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.