
छत्रपती संभाजीनगर : राजकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष हँडबॉल संघ रवाना झाला आहे.
सौराष्ट्र विद्यापीठ राजकोट (गुजरात) येथे १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला. या संघामध्ये निखिल आगोने, शुभम बच्चे, राहुल माने, धीरज बाबर, प्रसाद जाधव, राहुल गवळी, प्रवीण दिंडे, परेश चौधरी, ऋषिकेश चौधरी, सुरज भोसले, नवनाथ राठोड, जुबेर बागवान, दीक्षांत वैष्णव, आदित्य बोडके, राकेश वानखेडे, तुषार परदेशी या खेळाडूंचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. फिरोज सय्यद आणि संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. सत्यजित पगारे, अनिकेत निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संघाला कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप, डॉ. फिरोज सय्यद, डॉ. सत्यजित पगारे, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ. रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.