
हिंगोली तालुका क्रीडा स्पर्धा : कबड्डी स्पर्धेत आदर्श क्रीडा मंडळाला विजेतेपद
हिंगोली : नेहरू युवा केंद्राच्या हिंगोली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श क्रीडा मंडळाने कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अक्षय वानखेडे व शुभांगी राठोड यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल क्रमांक मिळवत स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपटू असा बहुमान संपादन केला.
हिंगोली येथील तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार, प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा अधिकारी बोधीकर तसेच प्रमुख मार्गदर्शक दत्ताराव बांगर, संजय भुमरे, गजानन आडे, रवी हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.
या स्पर्धेतील सर्व पदक विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजानन आडे यांनी केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
कबड्डी : १. आदर्श स्पोर्ट्स क्रीडा मंडळ, हिंगोली, २. अंधारवाडी कबड्डी टीम, ३. एकता स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली.
खो-खो : १. सरजू देवी भिकूलाल आर्य कन्या विद्यालय हिंगोली, २. शासकीय अनुसूचित जाती मुलींची शाळा कळमनुरी, ३. सरजू देवी क्रीडा मंडळ हिंगोली.
गोळा फेक : १. अभिषेक शिंदे, २. तेजस काकडे, ३. किरण पोटे.
गोळा फेक : १. वैशाली चव्हाण, २. दुर्गा काळे, ३. भाग्यश्री कांबळे.
१०० मीटर धावणे : १. अक्षय वानखेडे, २. सुरज काळे, ३. शुभम पाईकराव.
१०० मीटर धावणे : १. शुभांगी राठोड, २. दुर्गा काळे, ३. शिवानी सावळे.