
जळगाव : उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे १२ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात जळगाव जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनचे खेळाडू जयेश विलास पाटील व कुलदीप छोटू पाटील यांची निवड झाली आहे.
अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत २० वयोगट ८ किलोमीटर अंतर जयेश पाटील याने २५ :०९.६५ वेळ देत रौप्यपदक पटकावले. कुलदीप छोटू पाटील याने २५ :२०.४८ वेळ देत कांस्य पदक पटकाविले होते. जळगाव जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके, चेअरमन प्रा एम वाय चव्हाण, सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, प्रा इकबाल मिर्झा, गिरीश पाटील, योगेश सोनवणे, मुख्याध्यापक के यु पाटील, प्रमोद भालेराव, जितेंद्र फिरके यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.