
१२ सुवर्णपदकांसह पटकावली ३० पदके
पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई खुल्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये पुणे शहरातील शितो रयू कराटे शाळेतील पुण्याच्या कराटे संघाने १२ सुवर्ण, १२ रौप्य आणि ६ कांस्य अशी ३० पदकांची कमाई केली आहे. या कामगिरीने कराटे स्पर्धेत पुण्याचे नाव जगभरात पोहचले आहे.
चॅम्पियनशिपमध्ये काता आणि कुमिते स्पर्धांमध्ये पुण्याच्या ज्युबिलंट संघातील २० खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये झालेल्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, उझबेकिस्तान आणि श्रीलंका या पाच देशांतील एकूण २५० स्पर्धक सहभागी झाले होते.
अशोक गोलानी आणि विजय गोलानी यांच्या मार्गदर्शनाखाली शितो रयू कराटे शाळेच्या संघाने ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण समर्पण, धैर्य आणि मेहनती वृत्तीमुळे त्यांना हा टप्पा गाठण्यात मदत झाली.
योग्य मार्गदर्शनाशिवाय मोठे पराक्रम शक्य नाहीत, असे शितो रयू कराटे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांच्या कौशल्याचे आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाचे श्रेय त्यांचे प्रशिक्षक अशोक गोलानी आणि विजय गोलानी यांना दिले.