कुर्ला येथे १८ जानेवारी रोजी रंगणार स्पर्धा
मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान, कुर्ला शाखेतर्फे प्रथमच आंतर शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन १८ जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील हनुमान मंदिराजवळील गांधी मैदानात करण्यात आले आहे. १४ वर्षांखालील मुलांसाठी मोफत आयोजित ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळवली जाईल.
या स्पर्धेत केवळ प्रथम येणाऱ्या आठ शाळांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेची रंगत वाढणार असून, खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल.
विजेत्या व उपविजेत्या संघांना सुवर्ण आणि रौप्य पदकांसह आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू: विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संगठन समिती स्थापन करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका १४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. इच्छुक शाळांनी अविनाश महाडिक (क्रीडा शिक्षक) यांच्याशी ९००४७५४५०७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.