पालक व विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जल्लोषात

  • By admin
  • January 11, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतर्फे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : प्रशासन व पालक यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन पालक व शाळेतील आंतरक्रिया वाढून त्याचा वापर शैक्षणिक सुविधेबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी व्हावा यासाठी आयोजित जिल्हास्तरीय पालक आणि बालक क्रीडा स्पर्धेच्या प्रत्यक्ष मैदानावरील विविध क्रीडा प्रकारांचा शानदार समारोप झाला.

विभागीय क्रीडा संकुल येथे गेल्या ही स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी प्रत्यक्ष मैदानावर दिवसभर उपस्थित राहून प्रत्येक क्रीडा प्रकारातील पालक व विद्यार्थी खेळाडूंशी सुसंवाद साधून खेळाचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासमवेत उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, नीता श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, हेमंत उशीर, दीपाली थावरे, क्रांती धसवाडीकर, श्रीराम केदार, अनिल पवार, रंगनाथ आढाव, विलास केवट, सचिन शिंदे, प्रदीप राठोड, संगीता सावळे, संगीता गायकवाड, राजेश हिवाळे, प्रशांत हिवर्डे, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद
ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा या स्पर्धेसाठी प्रचंड प्रतिसाद लाभला. यातील यशस्वी खेळाडूंना केवळ मैदानावरच प्रोत्साहन मिळत होते असे नाही तर घरी गेल्यानंतर सुद्धा गावात प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत झाले. जिल्हास्तरावर १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावची विद्यार्थिनी व सोलेगाव येथील रहिवासी वैष्णवी शरद पवार हिची सोलेगावातून जवळपास तासभर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते.हेच या स्पर्धेचे फलित म्हणावे लागेल.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कृष्णा शिंदे, राजेश हिवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी लईक सोफी, सिताराम पवार, दिलीप शिरसाठ, जयेश चौरे, राजू फुसे, विजय दुतोंडे, अरविंद कापसे, अनिलकुमार सकदेव, विद्या दीक्षित, मनीष दिवेकर, बाळासाहेब म्हस्के, धनराज कांबळे, मनीषा वाशिंबे, कल्पना पदकोंडे, रमेश ठाकूर, डी के फुसे, शिवाजी भोसले, मुश्ताक शेख, अनिल पुदाट, राजेश महाजन, प्रदीप जाधव, सदाशिव पाटील, सतीश भारती, दिनेश अभंग, उज्वला ठोंबरे, आश्विनी महाले यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल 

सांघिक विजयी संघ : १४ वर्षाखालील मुले : व्हॉलिबॉल : सिल्लोड. कबड्डी : पैठण. रस्सीखेच : गंगापूर. खोखो : वैजापूर. क्रिकेट : कन्नड.

१४ वर्षाखालील मुली : व्हॉलीबॉल : कन्नड. कबड्डी : सिल्लोड. रस्सीखेच : पैठण. खोखो : वैजापूर. लंगडी : सिल्लोड.

१७ वर्षाखालील मुले : व्हॉलिबॉल : गंगापूर. कबड्डी : खुलताबाद. रस्सीखेच : वैजापूर. खोखो : वैजापूर. क्रिकेट : सिल्लोड.

१७ वर्षाखालील मुली : कबड्डी : फुलंब्री. खोखो : वैजापूर. लंगडी : पैठण. रस्सीखेच : फुलंब्री.

पुरुष गट : व्हॉलीबॉल : सिल्लोड. कबड्डी : खुलताबाद. रस्सीखेच : छत्रपती संभाजीनगर. खोखो : पैठण. क्रिकेट : छत्रपती संभाजीनगर.

महिला गट : कबड्डी : फुलंब्री. रस्सीखेच : सिल्लोड. खोखो :  फुलंब्री. लंगडी : छत्रपती संभाजीनगर.

वैयक्तिक स्पर्धेतील विजयी खेळाडू

१४ वर्षाखालील मुले : १०० मी धावणे : १. तन्मय ताराचंद राठोड (छत्रपती संभाजीनगर), २. अमर असलम शेख (छत्रपती संभाजीनगर).गोळाफेक : १. गोरक्षनाथ विठ्ठल गोलांडे (पैठण), २. सादिक रफिक शेख (गंगापूर).थाळीफेक : १. रुद्राक्ष गोरे (कन्नड), २. राजू गोरे (वैजापूर).लांबउडी : १. चैतन्य मनीष धणे (वैजापूर), २. पार्थ पाडसवाळ (कन्नड).

१४ वर्षाखालील मुली : १०० मी धावणे : १. वैष्णवी शरद पवार (गंगापूर), २. तनुजा शिंदे (सिल्लोड).गोळाफेक : १. अमृता अंकुश गंगावणे (छत्रपती संभाजीनगर), २. पुनम साईनाथ गंगावणे (छत्रपती संभाजीनगर).थाळीफेक : १. अमृता अंकुश गंगावणे (छत्रपती संभाजीनगर), २. गायत्री संतोष फासाटे (पैठण).लांबउडी : १. शिफा शाहिद सय्यद (वैजापूर), २. वैष्णवी शिंदे (सिल्लोड).संगीत खुर्ची : १. रूपाली कैलास जामकर (सिल्लोड), २. आश्विनी गणेश वीर (पैठण).दोरीवरील उडी : १. नंदिनी राजू राठोड (छत्रपती संभाजीनगर), २. अनुष्का रंगनाथ शिंदे (सिल्लोड).लिंबू चमचा : १. प्रीती नितीन डोंगरे (गंगापूर), २. अनुष्का अनिल सातपुते (पैठण).

१७ वर्षाखालील मुले : १०० मी धावणे : १. रोहित हुकुमचंद राठोड (पैठण), २. अर्जुन राजू पाडळे (सिल्लोड).गोळाफेक : १. संकेत संदीप जाधव (गंगापूर), २. बाळू सोमीनाथ मैद (फुलंब्री).थाळीफेक : १. प्रणव ज्ञानेश्वर कोलते (सिल्लोड), २. ज्ञानेश्वर चव्हाण (छत्रपती संभाजीनगर).लांबउडी : १. सोमनाथ ज्ञानेश्वर वाघ (पैठण), २. मुज्जम मुजफ्फर पठाण (गंगापूर).

१७ वर्षाखालील मुली : १०० मी धावणे : १. साक्षी भरत तळे (वैजापूर), २. आकांक्षा अशोक नजन (गंगापूर).गोळाफेक : १. सानिया नुसरत अली सय्यद (फुलंब्री), २. पल्लवी मांगीलाल राठोड (पैठण).थाळीफेक : १. अनुष्का बाळू जाधव (फुलंब्री), २. सानिया नुसरत अली (फुलंब्री).लांबउडी : १. वैष्णवी अण्णासाहेब शेळके (वैजापूर), २. रोशनी बबन राठोड (छत्रपती संभाजीनगर).संगीत खुर्ची : १. तमन्ना याकूब शेख (छत्रपती संभाजीनगर), २. आचल रमेश राठोड (पैठण).दोरीवरील उडी : १. प्रतीक्षा इंदुलसिंग चव्हाण (पैठण), २. रोशनी बबन राठोड (छत्रपती संभाजीनगर).लिंबू चमचा : १. आकांक्षा गणेश ठेंगडे (खुलताबाद), २. रूपाली मदन खरात (खुलताबाद).
पुरुष गट : १०० मी धावणे : १. बबन हजारे (वैजापूर), २. अस्लम नासिर शेख (गंगापूर).गोळाफेक : १. अमोल रावसाहेब गवळी (गंगापूर), २. संजय उत्तम डोभाळ (छत्रपती संभाजीनगर).थाळीफेक : १. संजय उत्तम डोभाळ (छत्रपती संभाजीनगर), २. अर्जुन गंगाधर रघु (फुलंब्री).लांबउडी : १. अस्लम नासिर शेख (गंगापूर), २. बबन हजारे (वैजापूर).

महिला गट : १०० मी धावणे : १. चंचल दागोडे (सिल्लोड), २. स्वाती रवींद्र भगुरे (गंगापूर).गोळाफेक : १. सुनिता राजेंद्र मोरे (गंगापूर), २. कावेरी कसारे (खुलताबाद).थाळीफेक : १. पूजा आडे (कन्नड), २. मोनिका काळे (सिल्लोड).लांबउडी : १. स्वाती रवींद्र भगुरे (गंगापूर), २. सविता युवराज करकाडे (सिल्लोड).संगीत खुर्ची : १. संध्या कडू धनुरे (गंगापूर), २. उर्मिला वेताळ (कन्नड).दोरीवरील उडी : १. दीपाली शिरसाठ (खुलताबाद), २. उज्वला पथवे (खुलताबाद).लिंबू चमचा : १. रेणुका गजानन फुटके (सोयगाव), २. कावेरी रण कसारे (खुलताबाद).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *