
छत्रपती संभाजीनगर : बारामती येथे झालेल्या शालेय बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात विशाल जारवाल याने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र संघात स्थान मिळवले.
नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशाल पात्र ठरला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला पदक मिळवून देण्याचा निर्धार विशाल याने व्यक्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजाराम राठोड, सचिव नितीन राठोड, प्राचार्य डॉ संजय शिंदे, प्रबंधक सीमा वडते, अधीक्षक शैलेश चव्हाण, पर्यवेक्षक विवेक थोरमोटे, डॉ सत्यजित पगारे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. विशालला प्रा सागर मगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.