
छत्रपती संभाजीनगर : मार्शल आर्ट्स प्रशिक्षक पवन घुगे यांना पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस उपायुक्त नांदेडकर यांच्या हस्ते मार्शल आर्टस उत्कृष्ट प्रशिक्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय परेड ग्राउंड येथे हा कार्यक्रम झाला. जालना जिल्हा येथे तायक्वांदो, वुशू, बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पोलिस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर पोलिस खेळाडूंनी विजय प्राप्त करत प्रथम स्थान मिळवले. मार्शल आर्ट्स प्रशिक्षक पवन घुगे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले.
या विजयाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नांदेडकर, प्रल्हाद राठोड, आसिफ शेख व पोलीस खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये मार्शल आर्टस प्रशिक्षक पवन घुगे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. याबद्दल मिशन मार्शल आर्ट्स संघटनेचे सचिव प्रवीण घुगे, प्रशिक्षक राधा घुगे, नंदा घुगे, कोमल राठोड, ऋतुजा रनवळकर, गौरव टोकटे राम बुधवंत, श्याम बुधवंत, राम चौरे, सोमया कुमार आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.