
श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव, स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन या सर्वांच्या औचित्याने आयोजित क्रीडा महोत्सव जल्लोषात घेण्यात आला.
दोन दिवस सुरु असलेल्या या क्रीडा महोत्सवात यावेळी १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोत्यात पाय घालून पळणे, दोरी वरील उड्या, रिले ४×१०० मीटर, रस्सी खेच अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आल्या.
शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाट यांच्या हस्ते शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी रेड, ग्रीन, येलो, ब्लू गटाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम मशाल व नंतर संचलनाद्वारे उपस्थित पाहुण्यांना सलामी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ आबासाहेब सिरसाट यांनी खेळाडूंनी शालेय जीवनात खेळाचे महत्व समजून घ्यावे. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ग्रामीण भागातील खेळाडू देशाचे नाव उंचावतील हे मात्र नक्की असा विश्वास सिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शाळेच्या माता व पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या खेळाडूंला प्राविण्य प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, वंदना चव्हाण, भाग्यश्री नरोडे, पूनम घुले, वंदना कैतके, सोनाली लबडे, शीतल नरोडे, किरण राजपूत, दिशा कुंढारे, मनीषा औटी, कोमल काकडे, सुप्रिया साबणे, रश्मी राजपूत, दीपिका वाघचौरे, वैशाली साबणे, क्रीडा शिक्षक नारायण राजपूत, विकी कहाटे, जोयेब पिंजारी, गजानन राऊत आदीसह सर्वांनी परिश्रम घेतले.