
नागपूर : धुळे येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय टेंग सू डो मार्शल आर्ट्स स्पर्धेत सेंट जॉन स्कूलच्या पूर्वी सुमित नागदवणे हिने शानदार कामगिरी बजावत रौप्यपदक पटकावले.
धुळे येथील पिपनेर येथील छत्रपती संभाजी मार्शल आर्ट्स स्कूलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा महाराष्ट्र टेंग सू डो असोसिएशनतर्फे घेण्यात आली.
या स्पर्धेत मोहन नगर येथील सेंट जॉन स्कूलच्या पूर्वी सुमित नागदवणे हिने १४ वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी केली आणि रौप्य पदक जिंकले. या घवघवीत यशाबद्दल प्राचार्य फादर विश्वास तोरणे, व्यवस्थापक फादर बास्को, पर्यवेक्षक तुळणकर, क्रीडा शिक्षक सॅव्हियो अँड्र्यू, अॅलन, अंकुश यांनी तिचे अभिनंदन केले आहे.