
छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथे झालेल्या २२व्या राज्यस्तरीय सीनियर वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर वुशू संघाने चमकदार कामगिरी नोंदवत तिसरा क्रमांक संपादन केला.
नांदेड येथील यशवंतराव महाविद्यालय क्रीडा संकुलावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर वुशू संघाने शानदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत नयन निर्मल (सुवर्ण, रौप्य), श्याम मुरमे (सुवर्ण), प्रफुल देशमुख (सुवर्ण), पवन भोजने (रौप्य), अक्षय सरदार (रौप्य), सुमित खरात (रौप्य, कांस्य), ओम निर्मल (रौप्य), मिलिंद जाधव (कांस्य), अशोक भवर (रौप्य), नयन निर्मल (सुवर्ण), अस्मिता सरदार (सुवर्ण), सुमित खरात (सुवर्ण), अक्षय सरदार (सुवर्ण), श्याम मुरमे (सुवर्ण), मिलिंद जाधव (सुवर्ण), अशोक भवर (सुवर्ण), कृष्णा शेळके (सुवर्ण), पवन भोजने (सुवर्ण), आम्रपाली आमराव (रौप्य), दुर्वा अहिरे (कांस्य), अजिंक्य नितनवरे (कांस्य), पवन वंजारे (कांस्य), प्रदीप पळसकर (कांस्य) यांनी आपल्या प्रकारात चमकदार कामगिरी नोंदवत पदके जिंकली.
या घवघवीत यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव महेश इंदापूरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक सय्यद झहूर अली व बंटी राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.