
छत्रपती संभाजीनगर : गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या श्रेयस पेरे, मयूर चव्हाण आणि वीरेंद्र राठोड या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.
गोवा राज्यातील पोंडा क्रीडा संकुलात १८ व १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार आहे. ऑल इंडिया कराटे स्पर्धेसाठी बिडकीन येथील तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना मार्शल आर्ट्स प्रशिक्षक पवन घुगे, प्रशिक्षक राधा घुगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य कराटे स्पर्धेमध्ये श्रेयस पेरे, मयूर चव्हाण, वीरेंद्र राठोड यांनी पदके जिंकली होती. तसेच हे तीनही खेळाडू ‘ब्लॅक बेल्ट’चे प्रशिक्षण पवन घुगे, प्रवीण घुगे व प्रशिक्षक राधा घुगे यांच्याकडे घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांचा मार्शल आर्ट्सचा नियमित सराव सुरू आहे.
मिशन मार्शल आर्ट्स अँड वूशू कुंग फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा बिडकीन या अकॅडमी मध्ये हे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. या निवडीबद्दल प्रशिक्षक नंदा घुगे, राधा घुगे , ऋतुजा रणवळकर, कोमल राठोड, डॉ सुरेश जंगले, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, सारिका पेरे, मिशन मार्शल आर्ट्स संघटनेचे अध्यक्ष पवन घुगे, सचिव प्रवीण घुगे आदींनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.